Petrol Diesel Price : जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे नवीन दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Published on -

Petrol Diesel Price : सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे. परंतु, तरीही या किमतींचा परिणाम देशातील शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दिसून आला नाही. पेट्रोल-डिझेलच्या किमती जैसे थेच आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी 5 डिसेंबर 2022 साठी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. नवीन दरांनुसार आज कोणताही बदल न केल्याने सलग 195 व्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. म्हणजे आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई दिसून येत आहे. सध्या, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 78 पर्यंत खाली आली आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 85 आहे.

सरकारने या अगोदर 21 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली होती. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

महानगरांमध्ये ही आहे किंमत

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात असून मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

येथे मिळते सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल

राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. तर गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

इथे मिळते सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. येथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

आजचे दर

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.

चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.

लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.

नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.

जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.

म्हणून देशात पेट्रोल आणि डिझेल महाग

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्यांची किंमत डबल होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलत असतात.

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज बदलत असून त्या रोज सकाळी ६ वाजता अपडेट होतात. तुम्हाला नवीन दर एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. त्याशिवाय, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!