टोकियो : शेकडो वर्षांची परंपरा असलेली अनेक हॉटेल जगामध्ये आहेत. अर्थात काळासोबत ती आपल्यामध्ये बदल करून घेत असतात. मात्र जपानमध्ये असे एक हॉटेल आह, ज्याने आजही आपला इतिहास कायम टिकवून ठेवला आहे. हे जगातील सर्वात प्राचीन हॉटेल असून त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्येही दाखल आहे.
‘निशियामा ओनसेन कियूनकन’ असे या हॉटेलचे नाव आहे. फुजिवारा महितो नावाच्या व्यक्तीने सन ७०५मध्ये हे हॉटेल सुरू केले होते. १३०० वर्षांपूर्वीचे हे हॉटेल आज त्याच कुटुंबाची ५२वी पिढी चालवत आहे. या हॉटेलमध्ये जगभरातून लोक येतात. त्यांच्यात काही मोठ्या हस्तींचाही समावेश आहे. हे हॉटेल आपल्या आलिशान गरम झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे झरे त्याला अन्य हॉटेलपेक्षा वेगळी ओळख मिळवून देतात.

या हॉटेलच्या एका बाजूस सुंदर नदी वाहते, तर दुसरीकडे घनदाट जंगल आहे. हॉटेलची खिडकी उघडल्यावर तुम्हाला तिथला शानदार नजारा दिसतो. तो पाहून तुम्हाला वारंवार तिथे जावेसे वाटेल. हॉटेलमध्ये एकून ३७ खोल्या असून त्यांचे एका रात्रीचे भाडे ३३ हजार रुपये आहे. या हॉटेलचे वेळोवेळी नुतनीकरण होत असते.
- घर किंवा फ्लॅट खरेदी करताना या ५ गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पैसे बुडण्याचा धोका!
- Ahilyanagar News : पावसात ‘तो’ झाडाखाली थांबला, इतरांनाही गप्पा मारायला बोलावले अन वीज कोसळली, क्षणार्धात मृत्यू…
- पुण्यात स्थलांतर करणाऱ्या महिलांमध्ये ‘या’ जिल्ह्याचा दबदबा ! आकडेवारी ऐकून विश्वास बसणार नाही
- Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार की सुरू राहणार ? एकनाथ शिंदेंची घोषणा
- Pune Metro : पुणेकरांना मोठा झटका ! बहुचर्चित मेट्रोला होणार इतका उशिर…