Ola Scooters Offers : संधी गमावू नका ! Ola S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे बंपर सूट ; होणार हजारोंची बचत

Ahmednagarlive24 office
Published:

Ola Scooters Offers :  भारतीय बाजारात मागच्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्राहक आता ह्या सेंगमेंटमध्ये एकापेक्षा एक स्कूटर खरेदी करत आहे.

तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज या बातमीमध्ये एका जबरदस्त स्कूटरबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही ऑफरमध्ये अगदी स्वस्तात देखील खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.

आम्ही येथे तुम्हाला भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर सेंगमेंटमध्ये एकहाती राज्य करणारी कंपनी ओलाबद्दल माहिती देत आहोत. कंपनीने आपल्या Ola S1 आणि S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटरवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी सूट जाहीर केली आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो कंपनी S1 Pro वर 4,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आणि 10,000 रुपयांची सवलत दिली आहे. S1 वर देखील 2,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.

Ola S1 Pro फीचर्स

ओलाच्या स्कूटरला भारतीय बाजारपेठेत अनेकांची पसंती आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. यामध्ये तुम्हाला 3 राइडिंग नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स मोड देखील मिळतात. तुम्हाला नॉर्मल मोडमध्ये 100 किमी, इको मोडमध्ये 125 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 90 किमीची रेंज मिळते.

Ola S1 Pro

इंजिन इलेक्ट्रिक स्कूटरच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यात 8.5kW बॅटरी पॅक मिळतो जो केवळ 3 सेकंदात 40kmph पर्यंत जाऊ शकतो. याचा टॉप स्पीड 116 किमी प्रतितास आहे आणि 3.97 kWh बॅटरी पॅकसह सिंगल चार्जवर 181 किमीची रेंज देते. तथापि, जर आपण त्याच्या ऑन-रोड रेंजबद्दल बोललो तर त्याची रेंज  100 ते 120 किमी आहे.

'This' electric scooter is making a splash in the market

 31 डिसेंबरपर्यंत सवलत वैध  

पहिली 10,000 रुपयांची सूट 31 डिसेंबरपर्यंत वैध आहे, तर कॅशबॅक ऑफर 18 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत वैध आहे. यामुळे, S1 Pro आणि S1 ची किंमत 1,25,000 रुपये आणि 97,999 रुपये (दोन्ही एक्स-शोरूम दिल्ली) झाली आहे. याशिवाय, तुम्ही EMI, शून्य डाउन पेमेंट, कमी व्याजदर, शून्य टक्के प्रक्रिया शुल्क आणि निवडक क्रेडिट EMI वर सवलत यांसारख्या पर्यायांसह स्कूटर खरेदी करू शकता.

हे पण वाचा :- Ration Card : मोठी बातमी ! 10 लाखांहून अधिक रेशनकार्ड ‘त्या’ प्रकरणात होणार रद्द ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe