अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पैशासाठी कोण कोणाला कधी आणि कशासाठी त्रास देईल, हे सांगता येत नाही. प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू उर्फ राजेश सापते यांनाही तो अनुभव आला.
सर्वांचे पैसे दिले असतानाही त्यांना पैशासाठी त्रास देणा-या संघटनेच्या नेत्यांना कंटाळून सापते यांनी आत्मत्या केली. आता या प्रकरणी त्यांच्या व्यावसायिक भागीदाराला अटक करण्यात आली आहे.
आत्महत्येपूर्वी व्हिडिओ व्हायरल :- आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ प्रसिद्ध करत राजू सापतेंनी युनियनचे पदाधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला होता. लेबर युनियनचे राकेश मौर्य, मिस्त्री नरेश विश्वकर्मा, गंगेश श्रीवास्तव उर्फ संजुभाई आणि अशोक दुबे यांचा शोध सुरू आहे.
राजेश सापते यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. राजू सापते यांनी शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली.
व्हिडिओत काय? :- आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडfओमध्ये राजू सापते म्हणाले होते, ‘मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत.
माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत, की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’
कोणाचेही पैसे थकीत नाहीत :- नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले, की माझे पेमेंट पूर्ण आहे. त्यांनी हेही सांगितलं, की आजपर्यंत दादांनी कोणतंही पेमेंट अर्धवट ठेवलेलं नाही, तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतावत आहेत.
ते माझं कुठचंही काम सुरू होऊ देत नाहीत. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तात्काळ सुरू करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरू असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम