मेसेज पाठवताना एक शब्द चुकीचा गेला आणि तिच्या वडिलांनी तिला चक्क वेश्या समजलं !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-मेसेज टाईप करताना कायम योग्य शब्द वापरण आवश्यक असतं. कारण एक शब्द तुमचं संपूर्ण संभाषण बिघडवू शकतो. इंग्लंडच्या एका हेअर ड्रेसरसोबत असेच घडले आहे.

तिच्याकडून मेसेज पाठवतानाएक शब्द चुकीचा गेला आणि तिच्या वडिलांनी तिला चक्क वेश्या समजलं. इंग्लंडच्या लिंकनशायरमधील क्लीथॉर्प्स येथे राहाणाऱ्या ३४ वर्षीय कर्स्टी मॅकी हिनं आपल्या आईला मेसेज केला आणि कंडीशनर घेऊन येण्यासाठी सांगितलं.

कर्स्टीनं आपल्या आईला कंडीशनरआणण्यास सांगितलं होतं, मात्र प्रिडिक्टिव टेक्स्टमुळे कंडीशनरच्या जागी तिच्याकडून चुकून कंडोम असं टाईप झालं. कर्स्टीनं सांगितलं की तिचे वडील किचनमध्ये होते. आईने तिथे आपला फोन चार्जिंगला लावला होता.

यामुळे वडिलांनी कर्स्टीचा मेसेज वाचला आणि ती वेश्या असल्याचा त्यांचा समज झाला.त्यांनी हा प्रकार कर्स्टीच्या आईला सांगितला. कर्स्टी मॅकीनं सांगितलं की हा मेसेज पाठवल्यानंतरही मला माझी चूक समजली नाही.

मात्र आईनं जेव्हा सांगितलं, की वडिलांनी हा मेसेज वाचून मला वेश्या समजलं आहे, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. कर्स्टीनं म्हटलं की माझे वडील अगदी जुन्या काळातील आहेत. त्यामुळे हा मेसेज वाचून त्यांना धक्काच बसला.

माझ्यासाठीही ही चूक लाजिरवाणी होती. मात्र, नंतर आईनं सगळं स्पष्ट केल्याचं तिनं सांगितलं आणि तिच्यासाठी कंडीशनरही घेऊन आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News