Travel with Aadhaar card : तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल की दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची लागतो. मात्र आता तुम्हाला दुसऱ्या देशात जाणयासाठी पासपोर्टची गरज नाही तर फक्त तुमच्याकडे आधारकार्ड पाहिजे. आधार कार्ड असेल तर तुम्ही विदेश वारी करू शकता.
परदेशात जाण्याची इच्छा आहे पण पासपोर्ट नाही. काही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक नाही. फोटो ओळखपत्र या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी आवश्यक परवानगी देईल आणि जर तुमचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त असेल,

तर तुम्ही फक्त तुमच्या आधार कार्डवर या देशांमध्ये प्रवेश करू शकता. अनुक्रमे भूतान आणि नेपाळ या दोन देशांच्या भेटीसंदर्भात माहिती दिली जात आहे. चला जाणून घेऊया पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय या देशांचा प्रवास कसा करता येईल…
भूतानला कसे जायचे
भूतानला भेट देऊ इच्छिणाऱ्या भारतीय प्रवाशांनी एकतर त्यांचा पासपोर्ट जवळ बाळगावा, ज्याची वैधता किमान ६ महिन्यांची आहे. जर तुमच्याकडे पासपोर्ट नसेल, तर तुमचे काम मतदार ओळखपत्रानेही होऊ शकते.
मुलांना जन्म प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक शाळेचे ओळखपत्र बाळगण्याचा सल्ला दिला जातो. भारत भूतानशी रस्ते आणि हवाई या दोन्ही मार्गांनी जोडला गेला आहे.
नेपाळला कसे जायचे
भारतातील सर्व प्रमुख विमानतळांवरून नेपाळमधील काठमांडूला हवाई सेवा आहेत. नेपाळमध्ये जाण्यासाठी भारतीयांना पासपोर्टची गरज आहे की नाही या प्रश्नाच्या उत्तरात नेपाळ सरकार म्हणते की आम्हाला फक्त तुमचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे कागदपत्र हवे आहे. यासाठी तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र किंवा भारतीय पासपोर्ट सादर करू शकता.
या देशांना भेट देण्यासाठी व्हिसा लागणार नाही
भूतान आणि नेपाळ व्यतिरिक्त असे काही देश आहेत जिथे पासपोर्ट आवश्यक आहे पण व्हिसा नाही. एक भारतीय पासपोर्ट धारक म्हणून, तुम्ही पूर्व व्हिसा मंजूरीशिवाय जगभरातील 58 प्रवासी स्थळांवर जाऊ शकता.
मालदीव, मॉरिशस, श्रीलंका, थायलंड, मकाओ, भूतान, कंबोडिया, नेपाळ, केनिया, म्यानमार, कतार, युगांडा, इराण, सेशेल्स आणि झिम्बाब्वे या लांबच्या यादीत भारतीय व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात.