Foreign Travel without Passport : प्रवाशांसाठी खुशखबर! आता पासपोर्ट नाही तर ‘या’ कागदपत्राने करा परदेशवारी

Foreign Travel without Passport : अनेकांना परदेशात जाण्याची ईच्छा असते. परंतु, पासपोर्ट नसल्यामुळे त्यांना फिरता येत नाही. आता याच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण प्रवाशांना आता पासपोर्टशिवाय परदेशात जाता येणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड गरजेचे असणार आहे. पासपोर्टशिवाय तुम्ही आता अनेक प्रवासी स्थळांवर जाऊ शकता.

भूतानला कसे जायचे

Advertisement

भूतानला भेट देऊ इच्छिणाऱ्या भारतीय प्रवाशांनी एकतर त्यांचा पासपोर्ट जवळ बाळगावा, ज्याची वैधता किमान 6 महिन्यांची आहे. जर तुमच्याकडे पासपोर्ट नसेल, तर तुमचे काम मतदार ओळखपत्रानेही होऊ शकते.

मुलांना जन्म प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक शाळेचे ओळखपत्र बाळगण्याचा सल्ला दिला जातो. भारत भूतानशी रस्ते आणि हवाई या दोन्ही मार्गांनी जोडला गेला आहे.

नेपाळला कसे पोहोचायचे

Advertisement

भारतातील सर्व प्रमुख विमानतळांवरून नेपाळमधील काठमांडूला हवाई सेवा आहेत. नेपाळमध्ये जाण्यासाठी भारतीयांना पासपोर्टची गरज आहे की नाही या प्रश्नाच्या उत्तरात नेपाळ सरकार म्हणते की आम्हाला फक्त तुमचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे कागदपत्र हवे आहे. यासाठी तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र किंवा भारतीय पासपोर्ट सादर करू शकता.

या देशांना भेट देण्यासाठी व्हिसा लागणार नाही

भूतान आणि नेपाळ व्यतिरिक्त असे काही देश आहेत जिथे पासपोर्ट आवश्यक आहे पण व्हिसा नाही. एक भारतीय पासपोर्ट धारक म्हणून, तुम्ही पूर्व व्हिसा मंजूरीशिवाय जगभरातील 58 प्रवासी स्थळांवर जाऊ शकता.

Advertisement

मालदीव, मॉरिशस, श्रीलंका, थायलंड, मकाओ, भूतान, कंबोडिया, नेपाळ, केनिया, म्यानमार, कतार, युगांडा, इराण, सेशेल्स आणि झिम्बाब्वे या लांबच्या यादीत भारतीय व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात.