पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येणार? या केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :- पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा सामना करावा लागत आहे.परंतू लवकरच दर कमी होणार आहे .

अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तसेच ग्रीन हायड्रोजन आणि इतर पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काम करत आहे, असेही ते म्हणाले.

‘ईटी ग्लोबल बिझनेस समिट’ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना, गडकरी म्हणाले की, सरकार 100 टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांपासून सार्वजनिक वाहतूक चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉल 20 टक्के मिसळले जाते, ज्यामुळे ते मिश्रित इंधन बनते आणि ते सामान्य पेट्रोलच्या तुलनेत अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे.

नितिन गडकरी म्हणाले, “या आठवड्यात, मी सर्व प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांच्या SIAM चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.

त्यांनी मला आश्वासन दिले की ते एकापेक्षा जास्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करतील. गडकरी यांच्या मते, लवकरच भारतातील बहुतांश वाहने 100 टक्के इथेनॉलवर चालतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe