अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात म्हणजेच बुधवारी दिवसाला राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
दरम्यान 1 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जवळपास दोन वर्षानंतर राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. राज्यात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 13 हजार 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.05 टक्के आहे.
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 544 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 007 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बुधवार दिवशी 38 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.
आतापर्यंत 4771 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4629 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 102 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत