साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच पहायला मिळाली होती. साई संस्थान हे खूप मोठे संस्थान आहे. राजकीय आणि सामाजिक पार्शवभूमी असलेल्या साई संस्थानाला विशेष महत्व आहे.

साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ आज दिनांक 22 जून रोजी सायंकाळ पर्यंत घोषित होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.आशुतोष काळे यांचे नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, विश्वस्त पदासाठी देवळाली प्रवरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत सदस्य अजित कदम यांचे नाव पुढे आलेले दिसत आहे.

शिर्डी संस्थांनचे नवीन विश्वस्त मंडळ निवडी बाबतचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याने सुरुवातीपासून अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व कॉग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.आशुतोष काळे हे पहिल्यापासून आघाडीवर आहेत. तसेच आ.रोहित पवार, आ.निलेश लंके यांचीही नाव चर्चेत होते.

मात्र जिल्ह्यातील पक्षातील लॉबीने ताकद लावल्याने तसेच पक्षातील काम पाहून आ. काळे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंतिम झाल्याचे समजते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत संस्थानचे चित्र स्पष्ट होणार आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसही अध्यक्षपदासाठी दावा करत असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आ.सुधीर तांबे हे अध्यक्षपदासाठी रेसमध्ये आहेत.

दरम्यान विश्वस्त पदासाठी राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राष्ट्रवादीचे प्रांत सदस्य तथा पवार कुटुंबियांचे नातलग अजित सर्जेराव कदम यांचे नाव विश्वस्त पदासाठी पुढे आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe