Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या योजना या सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जात आहेत. यातील पोस्टाच्या अनेक योजना खूप लोकप्रिय आहेत. यापैकी एक म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा योजना होय.
जर तुम्ही या योजनेत दररोज केवळ 95 रुपयांची बचत केल्यास तुम्हाला या योजनेत 14 लाख रुपये मिळू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत पॉलिसी होल्डर जीवंत असेल तर त्याला मनी बॅकचाही फायदा मिळतो. याचाच अर्थ असा की जितकी गुंतवणूक केली ती परत मिळते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुरू करण्यात आली आहे. जबरदस्त परतावा देणाऱ्यांसाठी ही योजना योग्य आहे. हे लक्षात घ्या की पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर सर्व्हायव्हल बेनिफिट्स बंद होतात तसेच दावेदारांना संपूर्ण विम्याची रक्कम देण्यात येते.
समजा जर या योजनेच्या गुंतवणूकदाराला ही मनी-बॅक पॉलिसीचा अतिरिक्त लाभ मिळाला, तर तुम्हाला या योजनेतून मुदतपूर्तीपूर्वीच पैसे मिळू शकतील.
जाणून घ्या योजना
या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी, गुंतवणूकदाराचे वय 19 ते 45 वयोगटातील असावे. या पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना पॉलिसीच्या परिपक्वतेवर बोनस मिळत आहे. हे 15 आणि 20 वर्षांसाठी खरेदी करण्यासाठी उपलब्ध असून ही योजना 1995 मध्ये सुरू करण्यात आली आहे. समजा जर यात गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर, त्याच्या नॉमिनीला बोनससह संपूर्ण विम्याची रक्कम दिली जाते.
एखाद्या व्यक्तीला यात किमान 19 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. यात गुंतवणूकदाराला ठराविक वर्षांनी पैसेही परत दिले जातील. समजा, जर तुमची पॉलिसी 15 वर्षांसाठी चालत असल्यास त्यात 20-20 टक्के फॉर्म्युलावर आधारित विमा रक्कम सहा, नऊ आणि बारा वर्षांनंतर उपलब्ध करण्यात येते.