Post Office Scheme: देशात छोट्या बचत योजनांसाठी पोस्ट ऑफिस एक बेस्ट पर्याय मनाला जातो. यामुळेच आज देशातील करोडो नागरिक पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहे.
तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या एकाद्या योजनामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनाबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तब्बल 35 लाख रुपये प्राप्त करू शकतात. चला तर जाणून घ्या या भन्नाट योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही येथे ग्राम सुरक्षा योजनेबद्दल बोलत आहोत. देशातील सर्व नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्ही 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.
त्याच वेळी, या प्लॅनमध्ये प्रीमियमची रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक भरली जाऊ शकते. जर तुम्ही एका महिन्यात 1500 रुपये म्हणजेच दिवसाला 50 रुपये गुंतवले तर तुम्हाला एकूण 35 लाख रुपये मिळतील.
ग्राम सुरक्षा योजनेत अर्ज करण्याची पात्रता
अर्जदार हा मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे असावे.
ग्राम सुरक्षा योजनेत अर्ज करण्यासाठी कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते
पासबुक
सक्रिय मोबाइल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
उत्पन्न प्रमाणपत्र
निवास प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र इ.
अर्ज करताना, सर्व आवश्यक कागदपत्रे self-attest केली पाहिजेत आणि अर्जासोबत दिली पाहिजेत.
ग्राम सुरक्षा योजनेसाठी अर्ज कसा करावा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जावे लागेल. तुम्ही अर्जाचा फॉर्म येथे मिळवू शकता. त्यानंतर अर्ज भरा आणि विचारलेल्या कागदपत्रांची self-attest करा. यानंतर, पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सबमिट करा आणि त्याची पावती घ्या. याप्रमाणेच तुमचा अर्ज ग्राम सुरक्षा योजनेत केला जाईल
हे पण वाचा :- IMD Alert : 8 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पावसाचा इशारा ! जाणून घ्या ताज्या अपडेट्स