Indian Railways : भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हणतात. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांना एक मोठे गिफ्ट दिले आहे.
आता इथून पुढे तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचवल्यानंतरच रेल्वे पुढे जाणार आहे.रेल्वेच्या या खास सुविधेचा प्रवाशांना खूप फायदा होईल हे नक्कीच. काय आहे ही विशेष सुविधा जाणून घेऊयात.

रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा खूप फायदा होईल. कारण रात्री गंतव्यस्थान चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांना रात्रभर जागे राहावे लागते. प्रवासी आता कॉल डेस्टिनेशन अलर्ट सेट करू शकतील. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना आता जागे राहण्याची गरज नाही.
असा घ्या फायदा
रेल्वेच्या या खास सुविधेमुळे प्रवाशांना आता बिनधास्त झोपता येईल. या नवीन सेवेअंतर्गत आता प्रवाशांना स्थानकावर पोहोचण्याच्या 20 मिनिटांअगोदर कॉल करून जागे केले जाणार आहे.
डेस्टिनेशन अलर्ट वेक अप अलार्म
‘डेस्टिनेशन अलर्ट वेक अप अलार्म’ असे या रेल्वेच्या खास सेवेचे नाव आहे. जर तुम्हालाही या सेवेचा लाभ घायचा असेल तर तुम्हाला फक्त रेल्वे हेल्पलाइन नंबर 139 डायल करावा लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला डेस्टिनेशन अलर्ट पर्याय निवडावा लागेल. प्रथम 7 आणि नंतर 2 अंक डायल करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतरतुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. यानंतर तुम्हाला स्टेशनवर पोहोचण्याच्या 20 मिनिटे अगोदर एक कॉल येईल.