Social Media Rules : नागरिकांनो .. सोशल मीडियावर ‘हे’ काम अजिबात करू नका ! नाहीतर बसणार 50 लाखांचा फटका; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Social Media Rules : देशात कोरोना काळानंतर आता जवळपास सर्व काम मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. यामुळे आज देशात सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सध्या अनेक मोठं मोठ्या कंपन्या आपल्या उत्पदनाची जाहिरात एखाद्या मीडिया इन्फ्लुएंसर्सकडून करू घेत आहे आणि आपला उत्पादन बाजारात विकत आहे.

यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार सरकार आता लवकरच सोशल मीडियासाठी नवीन कायदा आणणार आहे. ज्याचा प्रभाव मीडिया इन्फ्लुएंसर्सवर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे आणि कोणता नवीन नियम लागू होणार आहे.

मार्केटिंगचा सोशल मीडियामुळे खूप ट्रेंड बदलला आहे. सोशल मीडियावर असे अनेक  मीडिया इन्फ्लुएंसर्स आहेत, ज्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. अशा प्रभावशाली व्यक्तींमार्फतच कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करत आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो जेव्हा एखादा मीडिया इन्फ्लुएंस एखाद्या उत्पादनाची जाहिरात करतो तेव्हा त्याचे फॉलोअर्स  ते उत्पादन खरेदी करू शकतात. ग्राहक खरेदी करत असलेल्या वस्तूंचा दर्जा चुकीचा असेल तर तो फसवणुकीला बळी पडू शकतो. दुसरीकडे, निरोगी स्पर्धेवरही याचा परिणाम होतो. तक्रार आल्यानंतर ग्राहक मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 डिसेंबर रोजी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून मीडिया इन्फ्लुएंसर्ससाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.

50 लाखांपर्यंत दंड आकारला जाईल

मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल मीडिया इन्फ्लुएंसर्सना 50 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. अनेक इन्फ्लुएंसर्स त्यांच्या फॉलोअर्सच्या आधारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मार्केटिंग करून पैसे कमवतात. यासोबतच कोणत्याही उत्पादनाच्या जाहिरातीच्या बदल्यात ते महागडे गिफ्ट किंवा मोठी रक्कम घेतात.

नवीन नियम आल्यानंतर प्रभावकांना अशा भेटवस्तू किंवा पैशांची माहिती द्यावी लागेल.  नवीन मार्गदर्शक तत्त्वांनंतर, सोशलमीडिया इन्फ्लुएंसर्स  ते भेटवस्तू घेत आहेत किंवा एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी पैसे घेत आहेत याची माहिती सार्वजनिक करावी लागेल.

इन्फ्लुएंसर्सना तपशील द्यावा लागेल

तसेच, त्याला त्या कंपनीशी असलेले आपले नाते सार्वजनिक करावे लागेल. तसे न केल्यास, मीडिया इन्फ्लुएंसर्सना  50 लाखांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. याचा सरळ अर्थ असा आहे की फेसबुक-इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साइटवर तुमचे लाखो फॉलोअर्स असतील आणि तुम्ही एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असाल. त्या बदल्यात तुम्ही कंपनीकडून पैसे किंवा भेटवस्तू घेतल्या असतील, तर तुम्हाला त्याबद्दलची माहितीही द्यावी लागेल. तुमचा त्या कंपनीशी काय संबंध आहे हेही सांगावे लागेल. जर तुम्ही ही माहिती लपवलीत, तर तुम्ही अडकू शकता. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या CCPA प्लॅटफॉर्मवर तक्रार केल्यास तुम्हाला 50 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

हे पण वाचा :- FD Rates Hike : ग्राहक होणार मालामाल ! ‘त्या’ प्रकरणात PNB ने घेतला मोठा निर्णय ; वाचा सविस्तर