माळशेज रेल्वे कृती समितीचा लंके यांना पाठींबा समितीच्या कार्यकारी मंडळाचे पाठींब्याचे पत्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांना माळशेज रेल्वे कृती समितीने पाठींबा जाहिर केला आहे. कृती समितीच्या कार्यकारी मंडळाने लंके यांच्या पाठींब्याचे पत्र प्रसिध्दीस दिले आहे.

देशाची पश्‍चिम-पूर्व किनारपट्टी, मुंबई विशाखापट्टण यांना जोडणारा तसेच कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडयाला नजिकच्या मार्गाने मुंबईस जोडणारा अहमदनगर-कल्याण माळशेज रेल्वे मार्ग झाला पाहिजे या मागणीसाठी गेली तीस व माळशेज रेल्वे कृती समिती प्रयत्नशिल आहे. या मार्गासाठी निर्धार मेळावे, रेल्वे परिषदा, जनजागरण यात्रा, रेल्व रथयात्रा, ५ लाख लोकांची सहयांची मोहिम, दिल्ली यात्रा असे सोपस्कार या समितीने पार पाडले आहेत.

समितीच्या पाठपुराव्यामुळे सन २००६  साली या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले. सन २०१९  पर्यंत मुरबाडपर्यंत पहिल्या टप्प्याच्या मंजुरीच्या केवळ घोषणा होत आहे. हा पहिला टप्पा जुन्नर-मढ पर्यंत होणे हे व्यवहारीकदृष्टया सोयीचे आहे. रेल्वे मंत्रालयाकडे थर्ड घाट रेल्वे प्रोजेक्ट म्हणून नोंद असलेला हा रेल्वेमार्ग झाला तर मराठवाडयासह नगर, जुन्नर, मुरबाडच्या  शेतकऱ्याला उत्पन्नाचे जोडमार्ग प्राप्त होतील. या परिसरात पर्यटन उद्योग वाढेल व त्यातून रोजगार निर्मिती होईल असा या समितीला विश्‍वास आहे.

या रेल्वेमार्गासाठी स्व. खा. प्रकाश परांजपे, स्व. गोपीनाथ मुंडे, मधुकरराव पिचड, अजितदादा पवार,  सुप्रियाताई सुळे, प्रमोद हिंदूराव यांच्यासह अनेक मान्यवरांनही सक्रीय साथ दिल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

लंके यांची आत्मियता

या रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी नीलेश लंके यांनी कायम आत्मियता दाखविली. वेळोेवळी समितीला साथ दिली. त्यामुळे त्यांच्यासारखा धडाडीचा कार्यकर्ता खासदार म्हणून संसदेत जावा  या भूमिकेतून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. नीलेश ज्ञानदेव लंके यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.