Pune Railway News : सध्या संपूर्ण देशभर उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकजण उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने आपल्या मूळ गावी परतत आहेत. याशिवाय अनेकांनी पर्यटन स्थळांवर गर्दी केली आहे. आपल्या परिवारासमवेत, मित्रांसमवेत अनेकांनी ट्रिपचे आयोजन केले आहे.
याशिवाय लग्नसराईचा सीजन असल्याने सध्या रेल्वे गाड्यांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकावर अथांग जनसागर ओसंडून वाहत आहे. दरम्यान, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. अशातच, आता पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे पुणे ते मुजफ्फरपुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष गाडी (गाडी क्रमांक 05290) 29 एप्रिल ते एक जुलै या कालावधीत चालवली जाणार आहे.
ही गाडी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून साडेसहा वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मुजफ्फरपुरला 15.15 वाजता पोहचणार आहे. तसेच मुझफ्फरपूर – पुणे सुपरफास्ट एसी विशेष गाडी (क्रमांक 05289) 27 एप्रिल ते 29 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
ही ट्रेन या कालावधीत प्रत्येक शनिवारी मुझफ्फरपूर येथून 21.15 वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी 05.35 वाजता पुण्याला पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे या गाडीला हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना,प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.