7th Pay Commission : पाच वर्षांनी पुन्हा एकदा भारतात लोकशाहीचा महा कुंभ सजला आहे. 18 व्या लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. आज अर्थातच 26 एप्रिल २०२४ ला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. देशभरात आणखी पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार जून 2024 ला निकाल लागणार आहे. अशातच मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.
ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या आठवा वेतन आयोगा संदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाची भेट मिळण्याची दाट शक्यता आहे.
कारण की, आठवा वेतन आयोगाबाबत विभागीय अधिकाऱ्यांचे एकमत झाले असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. विशेष म्हणजे मीडिया रिपोर्ट मध्ये आठवा वेतन आयोगासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रात जे नवीन सरकार येईल, ते कोणत्याही पक्षाचे असो ते नवीन सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी काम करेल असे म्हटले जात आहे. मात्र याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
खरे तर, आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता तर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो. पहिला वेतन आयोग हा 1947 मध्ये आला होता आणि सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला होता.
मात्र सातवा वेतन आयोगासाठी ज्या समितीची स्थापना 2014 मध्ये झाली होती आणि प्रत्यक्षात सातवा वेतन आयोगात 2016 मध्ये लागू झाला आहे.
याचाच अर्थ नवीन आठवा वेतन आयोग 2026 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे.यामुळे अर्थसंकल्पात देखील आठवा वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते.
पण, त्यावेळी सरकारने आठवा वेतन आयोगाबाबत सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी स्वतः अर्थमंत्र्यांनी देखील आठवा वेतन आयोग लागू करण्यास नकार दाखवला होता.
आता मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे सरकार केंद्रात येईल ते सरकार आठवा वेतन आयोग लागू करेल असा दावा होऊ लागला आहे. यामुळे आता मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात असलेला हा दावा खरा ठरणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.