Sai Pallavi : अभिनेत्री साई पल्लवीला काश्मिरी पंडितांविषयी केलेले विधान भोवणार, वातावरण तापले असून नवा वाद पेटण्याची शक्यता

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) तिच्या लुक (Look) व स्माईलमुळे (Smile) नेहमीच चर्चेत असते. या अभिनेत्रीचा (Actor) चाहतावर्ग देखील मोठा आहे. मात्र आता तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.

साई पल्लवीने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर (social media) नवा वाद निर्माण झाला आहे. साई पल्लवीने बॉलीवूड (Bollywood) चित्रपट द काश्मीर फाइल्समध्ये (The Kashmir Files) दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने हा वाद सुरु झाला आहे.

“द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या.

काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” असे मोठे विधान साई पल्लवीने केले आहे. तिच्या या वक्तव्यावरून सध्या वातावरण तापले आहे.

तसेच “मी लहान होते तेव्हापासून मला शिकवलं गेलं आहे की एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे मी तटस्थ राहणं पसंत करते. ज्यांच्यासोबत अन्याय होतो आहे, त्यांची मदत करणं. कुणी लहान कुणी मोठं असं काही नसतं, सगळे समान आहेत असं ज्या घरात शिकवलं गेलं त्या वातावरणात मी वाढले आहे.

डावे आणि उजवे यांच्याविषयी मी ऐकलं आहे. पण त्यांच्यात कोण योग्य कोण अयोग्य हे मला सांगता येणार नाही. मला काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, असा सवाल साई पल्लवीने केला आहे.

दरम्यान, साई पल्लवीच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान एका ट्विटर युजरने ट्विट करून म्हटले की, ‘तुम्ही जे काही बोललात ते खूप चुकीचे आहे’.

तर दुसरीकडे, दुसर्‍या युजरने म्हटले आहे की, ‘मला साई पल्लवीची स्टाइल आवडली, दक्षिण भारतीय कलाकार कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत’. साई पल्लवीच्या वक्तव्यावर अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe