मुंबई : जेवणात मीठ (Salt) नसेल तर ते जेवण बेचव लागते. स्वयंपाक घरातील (kitchen) मीठ हा प्रमुख पदार्थ मानला जातो. आत्तापर्यत घरातील कमी पैश्यात मिळणारी वस्ती मीठ आहे. मात्र आता या मिठात देखील वाढ (Increase) होण्याची शक्यता आहे.
मात्र देशातील मीठाचे उत्पादन (Production reduce) ३० टक्क्यांनी घसरणार आहे. जाणून घ्या यामागची कारणे

देशात सर्वात जास्त मीठाचे उत्पादन होते ते गुजरात राज्यात. यंदा मान्सून लवकर येणार आहे, तर गेल्यावर्षी तो खूप लांबला होता. त्यामुळे उत्पादनाचा कालावधी खूप कमी उरला आहे.
त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. उत्पादन घटले तर सहाजिकच मीठाच्या किंमती वाढतील. त्यामुळे वाढत्या महागाईला मीठाचा तडका लागणार आहे.
गुजरात (Gujarat) राज्यात मीठाचे उत्पादन दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु होते. मात्र मान्सूनने हात दिल्याने गेल्यावर्षी मीठाचे उत्पादनाला ही उशीर झाला. समुद्र किनारी क्षेत्रावर यंदा एप्रिल महिन्यांच्या मध्यात उत्पादन सुरु झाले.
त्यामुळे उत्पादनात अगोदरच कमतरता होती. गेल्यावर्षी पावसाने ऑक्टोबर महिन्यात हजेरी लावली होती. त्यामुळे मीठाचे उत्पादन घेण्यास मीठागारांमध्ये शेतक-यांना खूप कमी कालावधी उरला आहे.
दरम्यान, यंदा मीठाचे उत्पादन घटले तर केंद्र सरकार मीठाच्या निर्यातीवर निर्बंध लागू करु शकते. भारत दरवर्षी ३ कोटी टन मीठाचे उत्पादन घेतो. अमेरिका (America) आणि चीन नंतर मीठागारातून मीठ उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. एवढेच नव्हे तर भारत जगातील ५५ देशांना मीठाची निर्यात करुन तिथल्या लोकांचे जेवण चविष्ट करतो.