SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सगळ्यात मोठी सार्वजनिक बँक आहे. जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 2 लाखांचा मोफत जीवन विमा देत आहे.
जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. जे ग्राहक जन धन खाते उघडतील केवळ त्यांनाच हा लाभ घेता येणार आहे. कारण जनधन खात्यासोबत 2 लाखांची ही विमा पॉलिसी मोफत देण्यात येत आहे.

कधी सुरु झाली ही योजना
प्रधानमंत्री जन धन योजना 2014 साली सुरू केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना परवडणार्या मार्गाने वित्तीय सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शनमध्ये प्रवेश सुनिश्चित करत असते.
स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे जन धन ग्राहकांना एसबीआय रुपे जन धन कार्ड सुविधा प्रदान करण्यात येते. ग्राहकांना या कार्डवर बँक 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाची सुविधा देण्यात येत असून इतकेच नाही तर रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढून खरेदी करू शकता.
हस्तांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बचत खाते जन धन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या खातेधारकांना बँकेकडून रुपे पीएमजेडीवाय कार्ड देण्यात येत आहे. यात, 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यांवर जारी करण्यात आलेल्या RuPay PMJDY कार्डची विमा रक्कम 1 लाख रुपये इतकी आहे. समजा ज्या ग्राहकांनी 28 ऑगस्ट 2018 पूर्वी आपले खाते उघडले असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेंतर्गत जारी करण्यात आलेल्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती कवच लाभ मिळत आहे.
अशाप्रकारे करा दावा
या योजनेअंतर्गत, वैयक्तिक अपघात धोरण भारताबाहेर घडणाऱ्या घटनांचा समावेश करते. जर तुम्ही आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर विम्याच्या रकमेनुसार भारतीय रुपयांमध्ये दावा देण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशानुसार आता लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसाच्या खात्यात नामनिर्देशित होऊ शकतो.