SBI Bank Update : भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे ग्राहकांची संख्या ही लाखांच्या घरात आहे. ही बँक आपल्या या लाखो ग्राहकांना सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. इतकेच नाही तर या बँकेचे व्याजदरही चांगले आहे.
अशातच जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण सध्या या बँकेच्या ग्राहकांच्या खात्यातून काही पैसे कापले जात आहेत. याचे कारण त्या खातेदारांना अजूनही समजले नाही. परंतु, आता बँकेनेच यामागचे मुख्य कारण सांगितले आहे.
जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल तसेच तिची बँकिंग सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असाल, तर वर्षातून एकदा तुमच्या बचत खात्यातून काही रक्कमेची कपात करण्यात येते. तसेच या कपातीबाबत अनेक ग्राहक बँकांमध्ये चकरा मारू लागतात.
या बँकेने अनेकांच्या खात्यातून 206.5 रुपये कापले आहेत. जर तुमच्या देखील बचत खात्यातून पैसे कापले असतील परंतु, तुमच्याकडून कोणताही व्यवहार न करता बँकेने हे पैसे का कापले असा तुम्हाला प्रश्न पडला असेल.
SBI कडून अनेक खातेदारांच्या खात्यातून 147 ते 295 रुपये कापण्यात आले आहेत. याचे मुख्य कारण हे आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया युवा, गोल्ड, कॉम्बो किंवा माय कार्ड (इमेज) डेबिट/एटीएम कार्ड असणाऱ्या ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारत आहे.
हे लक्षात घ्या की युवा डेबिट कार्ड, गोल्ड डेबिट कार्ड, कॉम्बो डेबिट कार्ड किंवा माय कार्ड (इमेज) डेबिट/एटीएम कार्ड यांसह यापैकी कोणतेही डेबिट/एटीएम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांकडून बँक वार्षिक देखभालीचा शुल्क म्हणून रु. 175 आकारत आहे.
इतकेच नाही तर आता या वजावटीवर 18% GST लागू करण्यात आला आहे, त्यामुळे रु. 31.5 (175 रु.च्या 18%) GST रकमेत जोडले गेले आहेत, त्यामुळे रु. 175 + रु. 31.5 सह, ही रक्कम रु. 206.5 इतकी आहे. त्यामुळे आता तुम्हाला हे समजून गेले असेल की या बँकेने तुमच्या बचत खात्यातून 206.5 रुपये का आणि कसे कापले?