जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याची शक्कल,कमी खर्चात बनविले खुरपणी यंत्र

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- ब्राम्हणी परिसरातील घेरुमाळ वस्तीवरील तरुण शेतकरी सतीश गोपीनाथ हापसे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून अवघ्या दोनशे रुपयात खुरपणी यंत्र बनवले.

सध्या सर्वत्र शेतकऱ्यांची कपाशी खुरपणी ची लगबग सुरू आहे. रान वापशावर असतानाच खुरपणी करून खत पडाव यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. मात्र, खुरपणी करण्यासाठी लागणारे मजूर शोधावे लागतात.

त्यासाठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती २०० रोज द्यावा लागतो. एवढे करूनही वेळेत मजूर मिळतील. याची शाश्वती नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी सध्या घरच्या घरी खुरपणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशाच प्रकारे घरच्या-घरी खुरपणी करत असताना तरुण शेतकरी सतीश हापसे यांना खुरपणी यंत्र बनवण्याची आयडिया सुचली. त्यांनी लागलीच मोहीम हाती घेऊन एका दिवसात गावातील वेल्डिंग दुकानातून ते आपल्या सोयीनुसार बनवून घेतले.

प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केले. पुन्हा त्या यंत्रात काहीसा बदल केला. अन् मंगळवारी दिवसभर त्या यंत्राच्या माध्यमातून एका दिवसात एक एकर कपाशी मधील गवत जमिनी आड करून रान काळभोर केले.

त्यांची ही युक्ती आता परिसरातील अन्य शेतकरी वापरत असून कमी खर्चात आणि कमी वेळेत खुरपणी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

अनेकांनी त्यांच्या कपाशी पिकाला भेट देऊन सदर यंत्राच्या माध्यमातून कशाप्रकारे खुरपणी होते याच प्रात्यक्षिक करून पाहिले अन् अभ्यास केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe