अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- शिवसेनाचा पदाधिकारी काकासाहेब शेळके याच्यासह नऊ जणांना पाेलिसांनी जुगार खेळताना रंगेहाथ अटक केली. सिव्हील हडकाे परिसरातील गणेश चाैकात दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
चाैकातील वैष्णवी लाॅटरी सेंटरमध्ये ते तिरट नावाचा जुगार खेळत हाेते. त्यांच्याकडून ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सुनील डेव्हिड हिवाळे, मिलिंद माेहन मगर, बंडू गणपत भाेसले,
नितीन कुशालचंंद गुगळे, अमर पांडुरंग ढापसे, सर्व रा. सिव्हिल हडकाे, महेश अशाेक ओझा, रा. भिंगार, काकासाहेब चंद्रकांत शेळके, अनिकेत राजेंद्र ओझा व अनिल माेहन मगर अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तिरट जुगाराच्या साहित्यासह ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सिव्हिल हडकाे परिसरातील गणेश चाैकातील वैष्णवी लाॅटरी सेंटरमध्ये पत्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती ताेफखाना पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून आराेपींना ताब्यात घेतले.
त्यांच्या विराेधात ताेफखाना पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अटक केलेला आराेपी काकासाहेब शेळके हा शिवसेनेचा पदाधिकारी असून महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापतींचा मुलगा आहे.
ताेफखाना पाेलिस ठाण्यापासून अवघ्या एक किलाेमीटर अंतरावर हा जुगार सुरू हाेता. मात्र, पाेलिसांनी माहिती मिळताच कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम