Side Effects Tea : चहा (Tea) हा अनेकांचा जीव की प्राण असतो. रोज सकाळी किव्हा दिवसातून अनेकवेळा लोक चहा पीत (drink) असतात. यामुळे आळस निघून जाऊन चेहऱ्यावर चमक येते.
शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये (traditional medicine) चहाचा वापर केला जात आहे. चहा पिण्याचे अनेक फायदे (advantages) आहेत. चहा प्यायल्याने कर्करोग, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका (Risk of cancer, obesity, diabetes and heart disease) कमी होतो, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
मात्र चहा एका मर्यादेत प्यावा. जर तुम्ही दिवसातून 3-4 कप किंवा त्याहून अधिक चहा पीत असाल तर ते आरोग्यासाठी (health) हानिकारक ठरू शकते. जास्त चहा प्यायल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे सांगत आहोत.
जास्त चहा पिण्याचे दुष्परिणाम (Side effects of drinking tea)
1. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, दिवसभरात वारंवार चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते. चहाच्या पानात टॅनिन नावाचा पदार्थ असतो, जो शरीरातील लोह घटकांना चिकटून राहतो आणि पचनसंस्थेतून काढून टाकतो. लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. रक्तक्षय असलेल्यांनी चहा पिणे टाळावे.
2. जास्त चहा प्यायल्याने अस्वस्थता आणि थकवा येऊ शकतो. चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. हा एक असा पदार्थ आहे जो शरीरातील अस्वस्थता आणि थकवा वाढवतो.याशिवाय तुम्ही तुमच्या दिनचर्येत जितके जास्त कप चहा टाकाल तितका झोपेवर परिणाम होईल.
कॅफिनमुळे झोपेच्या समस्या निर्माण होतात. यामुळे मानसिक आरोग्य बिघडते आणि तणाव आणि चिंता या समस्या निर्माण होतात.
3. चहा पिण्यामुळे व्यक्तीला पोटाच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. यामुळे अॅसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. गरोदर महिलांसाठी चहाचे घोटणे हानिकारक ठरू शकते. गरोदरपणात जास्त चहा प्यायल्याने महिलेसोबतच न जन्मलेल्या बाळालाही हानी पोहोचते. गरोदरपणात चहापासून दूर राहावे.