तर.. आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात बांधलेले नाहीत; राज ठाकरेंचा इशारा

Published on -

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी भाषणादरम्यान मशीदीवरील लाऊडस्पीकर (Loudspeaker) काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून राज्यातील राजकारणात अधिक तापत चालले आहे.

नुकतेच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदमध्ये (press conference) राज ठाकरे यांनी मुस्लिम धर्मियांना (Muslims) हा इशारा दिला असून ३ तारखेनंतर जशास तसे उत्तर दिले जाईल असे थेट सांगितले आहे.

राज ठाकरे म्हणाले, आमच्याकडून मिरवणुका निघतात, त्यावर दगडफेक होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हालाही दगड हातात घेता येतो. समोर जे काही हत्यार असेल ते हत्यार आमच्या हातात देऊ नका, असा इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला आहे.

तसेच यावेळी त्यांनी येत्या १ मे रोजी औरंगाबादला (aurangabad) जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. व ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही केली असून ज्यांना अयोध्येला यायचं आहे, त्यांनी माझ्यासोबत दर्शनाला यावं, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, सर्व मशीदीवरील लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. ते काढले जात नाहीत. तर आमच्या पोरांनी केलेल्या गोष्टी तुम्ही अनधिकृत कश्या मानता? असा सवाल करतानाच ज्या भोंग्यामुळे त्रास होत असेल अशा भोंग्यांना परमिट देऊ नका.

शांतता भंग करणाऱ्या परमिशन नको, असं कोर्टाने म्हटलं आहे. याही पलिकडे आपण काही समजणार आहे की नाही. मुस्लिमांनाही काही गोष्टी समजल्या पाहिजे. या देशापेक्षा धर्म मोठा नाही, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News