अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- आयएमएस रमेश फिरोदिया एज्यूकेशन ट्रस्ट संचलित सिड्सीच्या वुमन आंथरप्रीनर्स असो.तर्फे जागतिक योगा दिनानिमित्त फेसबुकच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ऑनलाइन योगा स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
सलग सात दिवस घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सांगितलेली आसने, प्राणायम क्रिया आदीचे व्हिडीओ स्पर्धकांनी पाठविले होते.त्याचे परीक्षण योगतज्ञ सौ. शीतल मालू यांनी केले.या स्पर्धेत सौम्या थिटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

आयएमएसचे संचालक डॉ.एम. बी.मेहता यांच्या हस्ते थिटे व सर्व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.यावेळी श्री. विक्रम बार्नबस , माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उदय नगरकर, परीक्षिका सौ. शीतल मालू, सिड्सी समन्वयक सौ. ऋचा तांदूळवाडकर,सौ.गौरी पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. एम.बी . मेहता म्हणाले,आजच्या परिस्थितीत शाररिक व मानसिक स्वास्थ उत्तम असणे गरजेचे असून त्यासाठी योग व प्राणाय मकरणे गरजेचे आहे. येत्या बिकट काळात सर्वांनी योगासने व प्राणायमचे ज्ञान घेतले पाहिजे.
त्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,आ स्पर्धेत सहभागी सर्वांचे तसेच विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. परीक्षिका सौ.शीतल मालू यांनी योग व प्राणायमाचे फायदे सांगितले ,
महिलांनी योगासने करणे अत्यंत गरजेचे असून त्यामुळे शाररिक क्षमता तर वाढतेच पण समस्यांना खंबीरपणे तोंड देण्याचे आत्मिकबळ हि प्राप्त होते असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ.ऋचा तांदूळवाडकर यांनी केले तर आभार सौ.गौरी पाटील यांनी मानले.
आयएमएसच्या फेसबुक पेजवर योगादिनी योगा प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ऑनलाइन योग स्पर्धेचा निकाल – प्रथम – सौम्या थिटे, दिव्तीय – सायली दराडे, तृतीय – प्रीती महुले. उतेजनार्थ – अश्विनी वसगडेकर,सोनम चौधरी . आयएमएस रमेश फिरोदिया एज्यूकेशन ट्रस्ट संचलित सिड्सीच्या वुमन आंथरप्रीनर्स असो.
तर्फे जागतिक योगा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाइन योगा स्पर्धेतील विजेत्यांना आयएमएसचे संचालक डॉ.एम. बी.मेहता यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
यावेळी श्री. विक्रम बार्नबस ,डॉ. उदय नगरकर,सौ. शीतल मालू, सौ. ऋचा तांदूळवाडकर,सौ.गौरी पाटील आदी.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम