नागरिकांच्या जिवाशी खेळणे बंद करून कोरोनाचा अहवाल वेळेवर द्या …

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे आजही करून तपासण्या वेगाने सुरूच आहे. मात्र यातच राहाता तालुक्यात एक मोठी समस्यां निर्माण झाली आहे.

तालुक्यात करोना निदानाकरिता घशातील स्त्राव तपासणीसाठी दिलेल्या व्यक्तीचे चाचणी अहवाल जवळपास महिनाभराने मिळत आहेत. हे अहवाल वेळेत प्राप्त होत नसल्याने अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे.

त्याचबरोबर वेळेत अहवाल न मिळाल्याने रुग्णाला योग्य उपचार मिळत नाहीत व करोनाचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहितीअशी, पिंपरी निर्मळ येथील अनेक रुग्णांना आरोग्य विभागातील शासकीय हालगर्जीपणाचा अनुभव येत आहे. प्राथमीक आरोग्य केंद्रात घशातील नमुना घेतल्यानंतर तब्बल तीन आठवड्यांनंतर रिपोर्ट मिळत आहेत.

रिपोर्ट वेळेत न मिळाल्याने रुग्णावर योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना चुकीच्या उपचारांना सामोरे जावे लागत आहे. अहवाल वेळेत न मिळाल्याने अनेक रुग्ण निर्धास्तपणे फिरून करोनाचा संसर्ग वाढविण्याची शक्यता जास्त आहे.

त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जिवाशी खेळणे बंद करून चाचणी अहवाल वेळेवर देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe