चोरटयाने डॉक्टराला गंडवले; क्रेडिट कार्डमधून लंपास केली हजारोंची रक्कम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- सायबर चोरट्यांनी डॉक्टर वापरत असलेल्या क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार 250 रुपये काढून घेतले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगाव येथील डॉ. मयूर सोनाजी लांडे (वय 34 रा. लांडेगल्ली, शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, 28 डिसेंबर 2021 रोजी वैजापूर येथून भाऊ मनोज यांच्यासमवेत रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास शेवगावकडे कारने येत होते.

डॉ. लांडे यांच्याकडे भारतीय स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड होते. या कार्डमधून 14 हजार 850 रुपये कपात झाल्याचा त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला.

त्यानंतर सलग अशा स्वरुपाचे पाच मेसेज येऊन खात्यातून 74 हजार 250 रुपये कपात झाले. त्यांनी या मेसेजचे मोबाईलवर स्क्रीनशॉट काढून घेतले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर पोलिसांनी फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.