मुंबई :- बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एका मराठी चित्रपटातून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का देण्यास येत आहे.
बादशहा शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘लैला मै लैला’ या आयटम साँगवर थिरकणारी सनी आता मराठी प्रेक्षकांनाही तिच्या अदांनी घायाळ करणार आहे.
आगामी ‘बॉईझ्’ या चित्रपटात ती आयटम साँगवर डान्स करताना दिसणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वतः गायक अवधूत गुप्ते यानेच दिली आहे.
अवधूत म्हणाला की, ‘आमच्या चित्रपटात सनी एक आयटम नंबर करत आहे. आम्हाला या चित्रपटाद्वारे मराठीत कधीच झाले नाही असे काही तरी करून दाखवायचे होते.
त्यामुळे बॉलिवूडमधील सुप्रसिध्द चेहऱ्याचा यात उपयोग करून घ्यायचे आम्ही ठरवले. यासाठी निर्माता राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि त्यासाठी ते कायम सनीच्या संपर्कातही होते. चित्रपटातील सनीच्या सहभागाने आम्हाला खूप आनंद झाला आहे.
- अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !
- रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स
- अब्जावधी रुपये खर्चुनही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
- Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
- Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…