पंतप्रधान मोदी आणि योगींमध्ये वाद असल्याच्या चर्चांना उधाण

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-सोशल नेटवर्किंगवर मागील काही दिवसांपासूनच सोशल नेटवर्किंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. अचानक आखण्यात आलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या या दिल्ली दौऱ्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये उलटसुटल चर्चांना सुरुवात झाली आहे.

पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांमध्ये काही मतभेद आहेत का हा प्रश्न उपस्थित होण्यामागील महत्वाचं कारण म्हणजे सोशल नेटवर्किंगवर सुरु असणाऱ्या चर्चा.

भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी योगींना ५ जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन योगींना शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर या दोन्ही नेत्यांमध्ये काही मतभेद आहेत का अशी चर्चा सुरु झाली.

खास करुन भाजपा विरोधकांकडून असा प्रश्न विचारला जात असल्याचं दिसून येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे समर्थक आणि नेत्यांनाही यासंदर्भात शंका उपस्थित केल्यात. काही दिवसांपूर्वी तर #ModiVsYogi हा टॉप ट्रेंडींग टॉपिक होता.

आम आदमी पार्टीचे नेते आणि समर्थक असे ट्विट करण्यामागे मागे नाहीयत. भाजपाने मात्र हा हॅशटॅग आणि मोहीम म्हणजे उत्तर प्रदेश निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी रचलेला डाव असल्याचं म्हणत मोदी आणि योगींबद्दल केले जाणारे दावे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, सोशल नेटवर्किंगवर या चर्चा सुरु असल्या तरी योगींच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवली जाण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढील आठ महिन्यांनी, फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून योगींची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे.

२०१७ मध्ये भाजपने राज्यात मोठे यश मिळवून सत्तापरिवर्तन घडवले होते. पाच वर्षांनंतर ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून त्यासाठी पक्ष संघटना सक्रिय केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe