टेक्सास :- आपल्या अपत्यांवर प्रत्येक आई – बाप प्रेम करतात, त्यांना हवं तास बनविण्यासाठी आयुष्य खर्च करतात, मात्र काहीवेळा असे काही कृत्य हातून घडते कि ज्याचा अंदाजही लावला जावू शकत नाही.
मुलाचे केस नीट न कापल्याचा राग अनावर झालेल्या पित्याने न्हाव्यावर बंदुकीतून ३ गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी पिता मुलासह फरार झाला आहे. ही घटना अमेरिकेतील टेक्सासची आहे. हॅरिस काउंंटीच्या शेरिफानी सांगितले, १३ वर्षांचा मुलगा केस कापल्यानंतर घरी परतला.
वडिलांना न्हाव्याचा राग आला. तो पुन्हा न्हाव्याकडे गेला. त्याच्याशी वाद झाले. न्हाव्याने पैसेही परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु वडील यास तयार नव्हते.
त्याने न्हाव्याच्या पोटात, पायात व हातावर गोळ्या झाडल्या. न्हावी रुग्णालयात उपचार घेत आहे दरम्यान या प्रकरणाची चौकशी चालू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.