अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कोरोना आणि यातच सुरु असलेलं लॉकडाऊन यामुळे अनेकांची रुळावरील गाडी घसरली आहे. यामुळे अनेकांच्या आयुष्यात चढउतार आले आहे. यातच या विषाणूच्या प्रादुभावामुळे सर्वच क्षेत्रावर चांगलाच परिणाम झालेला पाहायला मिळाला होता.
आता यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राजु साप्ते यांनी आज आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. तत्पूर्वी एक सुसाईड व्हिडिओही त्यांनी बनवला आहे.
साप्तेंच्या निधनाच्या वृत्तानंतर मनसेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले की, यापुढे कलाकारांना त्रास दिल्यास हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच आहे, असा इशाराच खोपकर यांनी दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही.
मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर मनसेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन खोपकर यांनी केले आहे.
तसेच, भविष्यात कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच समजा, असा थेट इशाराच खोपकर यांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम