बत्ती गुल ! महावितरणच्या निष्काळजीपणामुळे गाव सापडले अंधारात

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- आर्थिक वसुलीसाठी नेहमीच अग्रेसर असलेलं महावितरण विभाग सक्षम सुविधा देण्यात नेहमीच अपयशी ठरले आहे. यामुळे आजही ग्रामीण भागातील अनेक गावे अंधारात सापडली आहे.

दरम्यान महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका नेवासा तालुक्यातील सलाबतपूर गावाला बसला आहे. सलाबतपूर येथे दोन आठवड्यांत तीन रोहित्रे नादुरुस्त झाल्याने अर्धे गाव अंधारात सापडले आहे.

मात्र हि समस्या सोडवण्याऐवजी महावितरणचे कर्मचारी यास टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सलाबतपूर मध्ये सततच्या वीज चोरीमुळे पूर्ण दाबाने कधीच वीज पुरवठा होत नाही.

मात्र वीजवितरण अधिकारी वीज चोरांवर कधीच कारवाई करताना दिसत नाहीत. उलट अधिकृत वीज धारकांकडून पठाणी स्टाईलने वसुली केली जाते. वीजबील न भरणारांचे वीज कनेक्शन कट केले जाते.

तीन रोहित्र जळूनही अधिकार्‍यांना या रोहित्राला जोडलेल्या विजेची चोरी नक्की कोठे होते हे पाहणेही जमले नाही. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात अंधाराचा सामना करावा लागत आहे .

गेल्या पंधरा दिवसांत तीन रोहित्रे जळाली आहेत. यामुळे अर्धे गाव अंधारात सापडले आहे. आता तीन रोहित्रानंतर गावठाण भाग नक्की कधी प्रकाशमान होईल हे सांगणे कठिणच आहे .

दरम्यान महावितरण अधिकार्‍यांनी नविन रोहित्र बसवण्याआगोदर वीज चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अधिकृत जोडणीधारक वीज ग्राहकांमधून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe