वृद्ध महिलेचे धुमस्टाइल गंठण लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील गणेशनगर येथे राहणाऱ्या शकुंतला ज्ञानदेव पालवे (६५) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७ तोळ्याचे दीड लाखांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी धूमस्टाईल लांबवले.

ही घटना गुरुवारी अकोले बायपासच्या स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ घडली. पालवे यांच्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात चोरट्यांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तपास सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे करीत आहे. चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.