बँक लॉकर्सच्या नियमांत आरबीआयने केले ‘हे’ महत्त्वाचे बदल… जाणून घ्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-  बँकांच्या विविध सेवांमध्ये बँक लॉकर ही देखील एक महत्त्वाची सुविधा आहे. तुम्ही देखील बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

रिझर्व्ह बँकेनं लॉकर भाड्यानं घेण्यासंबंधित असलेल्या मार्दर्शक सूचनांमध्ये काही बदल केले आहे. जर तुम्ही लॉकरचा वापर करत असाल तर यात काय बदल होऊ शकतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

रिझर्व्ह बँकेच्या मते, बँकांना त्यांच्या संचालक मंडळानं मंजूर केलेल्या अशा धोरणांची अंमलबजावणी करावी लागेल, ज्यात निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी त्यांची जबाबदारी निश्चित करता येईल.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती किंवा ‘अॅक्ट ऑफ गॉड’ अर्थात भूकंप, पूर, वीज किंवा वादळ झाल्यास कोणत्याही नुकसानीस बँक जबाबदार राहणार नाही. तथापि, बँकांना त्यांच्या परिसराला अशा आपत्तींपासून वाचवण्यासाठी योग्य व्यवस्था करणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेची सुधारित नियमावली

  • बँका आता लॉकर्ससाठी तीन वर्षांचे टर्म डिपॉझिट घेऊ शकतात. यामधून तीन वर्षांचे भाडे आणि गरज पडल्यास लॉकर फोडण्यासाठीच्या पैशांचा समावेश असेल. मात्र, सध्या बँकेत लॉकर्स असलेल्या ग्राहकांना टर्म डिपॉझिटची सक्ती केली जाणार नाही.
  • बँकेच्या लॉकरमध्ये कोणतीही बेकायदेशीर किंवा धोकादायक गोष्ट ठेवू नये. गेल्या काही काळामध्ये बँकेच्या लॉकरमध्ये बेकायदेशीर वस्तू ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा नियम लागू केला आहे.
  • ग्राहकाला लॉकर देताना बँकेने स्टॅम्पपेपरवर त्याचा करारनामा करावा.
  • ग्राहकाने सलग तीन वर्षे भाडे थकवल्यास बँकेला लॉकर फोडण्याची परवानगी असेल.
  • नैसर्गिक संकटामुळे अथवा देवाच्या करणीमुळे लॉकरमधील वस्तू गहाळ झाल्यास बँक त्यासाठी जबाबदार असणार नाही.
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
  • फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe