आयुष्यात दुधासोबत चुकूनही खाऊ नका हे सात पदार्थ…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  दूध आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. परंतु हे काही पदार्थांसोबत खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.

आयुर्वेदमध्ये हे खाण्याचे ‘विरुध्द आहार’ नियम समजावले आहेत. यानुसार काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने इनडायजेशन, वजन वाढणे, स्किन डिसिज सारख्या अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात.

जीवा आयुर्वेद, नवी दिल्लीचे डायरेक्टर डॉ. प्रताप चौहान सांगत आहेत, दूध कोणकोणत्या पदार्थांसोबत खाणे टाळावे.

  • 1) दही – दूध आणि दह्याने तयार केलेले पदार्थ एकत्र खाऊ नका. हे एकत्र खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस, वोमेटिंग आणि इनडायजेशनची समस्या होऊ शकते.
  • 2) लिंबू – लिंबू किंवा आंबट पदार्थ खात असाल तर एक तासांपर्यंत दूध घेणे अवॉइड करा. हे एकत्र खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते.
  • 3) आंबट फळे – दूध आणि आंबट फळे मिसळून बनवलेले शेक कधीच पिऊ नका. हे फळ खाल्ल्याने 2 तासांपर्यंत दूध पिऊ नका. यामुळे वोमेटिंग, लूज मोशनची समस्या होऊ शकते.
  • 4) चटपटीत किंवा सॉल्टी पदार्थ – दूधासोबत चिप्स, चटपटीत यांसारखे पदार्थ अवॉइड करा. मीठामुळे दूधातील प्रोटीनचा पुर्ण फायदा मिळत नाही. त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.
  • 5) केळी – सर्दी-पडसे, खोकला किंवा कफची समस्या असेल तर दूधसोबत केळी खाणे अवॉइड करा. हे कॉम्बिनेशन कफ वाढवते.
  • 6) कांदा – पदार्थांमध्ये कांदा आहे तर त्यासोबत किंवा त्यानंतर दूध अवॉइड करा. हे कॉम्बिनेशन खाज, एग्जिमा, सोरायसिस समस्या त्वचेच्या समस्या निर्माण करते.
  • 7) मिर्ची – मिर्ची-मसाल्याचे पदार्थ खात असाल तर यासोबत दूध किंवा दूधापासून तयार केले पदार्थ खाणे टाळावे. हे खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी, गॅस आणि वोमेटिंगची समस्या होऊ सकते.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe