अमीर खान कपिल शर्मा शोमध्ये कधीही न जाण्याचे ‘हे’आहे कारण

द कपिल शर्मा शो हा प्रसिद्ध कॉमेडी शो कुणाला माहित नाही असे होणार नाही. आज या शो ने अनेक रेकॉर्ड केले आहेत. यात प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात.

चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी तर प्रत्येक कलाकारांची पहिली पसंत ही याच शो ला असते. परंतु या शो मध्ये अनेक कलाकार येऊन गेले , परंतु मिस्टर परफेक्टनिस अमीर खान कधी आलेला दिसला नाही.

कपिलने आमंत्रण देऊन देखील काही कलाकारांनी कपिलच्या कार्यक्रमाला आजवर हजेरी लावलेली नाही. यात अमीर खान देखील आहे.

राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार आमिरला कपिलच्या शोमध्ये जाणं पसंत नाही. कारण या शोमध्ये अनेक वेळा कपिल महिलांवर विनोद करतो.

अनेक वेळा स्टार्सची ही खिल्ली उडवली जाते. अनेक कलाकार आपल्या चित्रपटांचे मालिका अथवा कार्यक्रमाद्वारे प्रमोशन करत असतात. पण यासाठी आमिर खान हा अपवाद ठरतो.