“जे हजर झाले नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार” अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना खडसावले

Content Team
Published:

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Staff) गेल्या काही दिवसापासून संप सुरु आहे. मात्र अजूनही एसटी कर्मचारी संप माघे घेयला तयार नाहीत. विलीनीकरणाच्या अटीवर ठाम राहून ते संप करत आहेत. मात्र आता परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे.

आजपासून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी ३१ मार्चपर्यंतचा अवधी दिला होता.

अनिल परब पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, 31 मार्चपर्यंतची मुदत आज संपतेय. आज संध्याकाळी माझ्याकडे आकडा येईल. जे हजर झालेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई (Action) नाही! बडतर्फ, निलंबित होते, जे आज अर्ज घेऊन हजर झाले, त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल.

मात्र जे हजर झाले नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार. आतापर्यंत 7 वेळा मी त्यांना हजर राहण्याचं आवाहन केलं होतं. असा समज झाला आहे की प्रशासन काहीच करत नाही. हेच पाहता आम्ही 11 हजार कंत्राटी कामगार नेमत आहोत.

आमचे रुट्स पण फायनल झालेत, आमच्या 12 हजार फेऱ्या चालतात, त्या नवीन रचनेत बसतील ते सुरु होणार. आता जे कामावर येत नाही, त्यांना नोकरीची गरज नाही असा समज आहे, त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत.

पुढे बोलताना परब म्हणाले, 5 तारखेपर्यंत सेवा समात्त करु नका, असा कुठलाही आदेश न्यायालायाचा नाही. न्यायालयासमोर जो अहवाल ठेवला होता, त्यावर न्यायालयाने कॅबिनेटची मंजुरी मागितली होती.

कॅबिनेटची मंजुरी (Cabinet approval) आम्ही घेतली आहे, त्याचा ड्राफ्ट आम्ही कोर्टासमोर (Court) सादर करु, कोरोना काळातील स्टेटस मागितला होता, याबाबतचा सगळा डेटा सादर करु असेही ते म्हणाले आहेत.

नियमानुसार जी कारवाई करायची असते, ती सर्व कारवाई आता केली जाईल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामध्ये निलंबन असेल, बडतर्फी असेल वा सेवासमाप्ती असेल.

आज शेवटचा दिवस होता. आमची एसटी कमिटी ठरवते, त्यानुसार ते कंत्राटी कर्मचारी भरले जाणार असल्याचंही अनिल परबांनी म्हटलंय.

5 हजार बस आता धावतात, त्यानंतर आता कंत्राटी कामगारांचा (Contract workers) वापर करुन अजून 5 हजार बस चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असे म्हणत अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना खडसावले असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe