वेळ संपली, कोणाचीही माघार नसल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार

Ahmednagarlive24 office
Updated:

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली.

यावेळेत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उरले असून त्यासाठी मतदान घ्यावे लागणार आहे. १० जून रोजी हे मतदान होईल.

शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही.

सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे साधारण ३० च्या आसपास मते आहेत.

त्यामुळे उर्वरित १२ मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फडणवीस यांच्यापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला. राज्यसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला संधी द्या, विधान परिषदेत याची भरपाई करू, असा प्रस्ताव होता. मात्र तो फेटाळण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe