UP Assembly Elections 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दणदणीत विजय ! ‘इतक्या’ लाख मतांनी विजयी

UP Assembly Elections 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशाचे (Uttar Pradesh) भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर (Gorakhpur) मतदार संघातून १ लाख २ हजार मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच भाजपने २६८ जागांवर मुसंडी मारली आहे.

त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलल्याचे दिसत आहे. आतापर्यंत असे बोलले जायचे की उत्तर प्रदेश मध्ये २ वेळा कोणताच पक्ष निवडून येत नाही. पण भाजपने ते समीकरण बदलले आहे.

उत्तर प्रदेश मध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच कार्यकर्त्ये मोठा जल्लोष करत आहेत. तसेच भाजपच्या दिल्ली कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या सपा पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये १३० जागा मिळाल्या आहेत. तर मायावतींच्या बीएसपी ला हत्ती सपाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ५ पैकी ४ राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला यश आल्याचे दिसत आहे.

गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कोणतेही मिळू शकलेले नाही. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना भाजप नेत्यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe