भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संपर्ग साधला. यावेळी पीएम मोदी यांनी ट्रम्प यांच्यासमवेत कोरोनाविषयी चर्चा केली.
पंतप्रधानांनी ट्रम्प यांना जगाला कोरोना मुक्त करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
या आवाहनाला प्रतिसाद देत भारताला अनुदानाच्या स्वरूपात व्हेंटिलेटर देणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.
ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला अभिमान आहे की अमेरिका भारतासारख्या माझ्या मित्राला व्हेंटिलेटर दानाच्या स्वरूपात देणार आहे. या साथीच्या वेळी आम्ही सर्व भारतासमवेत उभे आहोत.
आम्ही लस तयार करण्यात एकमेकांना मदत करत आहोत. एकत्र मिळून आम्ही कोरोनासारख्या शत्रूचा पराभव करू, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. भारत हा अमेरिकेचा प्रमुख भागीदार बनला आहे. अमेरिका भारताला 200 व्हेंटिलेटर देऊ शकेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.