पुणे : मनसेचे (MNS) पुण्याचे (Pune) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना मनसे प्रमुख शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर त्यांनी फेसबुक (Facebook ) वर एक भावनिक पोस्ट (Post) केली आहे. वसंत मोरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याबाबत वक्तव्य केल्यानंतर नाराज झाले आहेत.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी बैठक पार पडली आहे. राज ठाकरे यांनी स्वतः वसंत मोरे यांना बोलावले होते.
मात्र झालेल्या बैठकीत वसंत मोरे यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. पक्षाने आदेश देणारे एक पत्रक काढले होते त्या पत्रकावर राज ठाकरे यांची सही होती.
यानंतर राज ठाकरे यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे, यामध्ये त्यांनी मी आजच साहेबांच्या हस्ते उदघाटन केलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानात असे रंग भरले होते आणि आजच… अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केल्यानांतर वसंत मोरे यांनी लगेच त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. तसेच मनसेचे पुण्यातील दुसरे नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) हेही नाराज असल्याचे वृत्त आले होते.
वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर साईनाथ बाबर यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे साईनाथ बाबर यांची नाराजी दूर झाली का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना अडचण काय?
वसंत मोरे गेली १० वर्षांपासून कात्रज (Katraj) मतदार संघातून नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. त्यांच्या या मतदार संघामध्ये मुस्लिम मतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत याचा फटका बसू शकतो म्हणून मोरे नाराज आहेत.
तसेच साईनाथ बाबर हे कोंढवा (Kondhwa) मतदार संघातून नगरपालिकेची निवडणूक लढवतात. त्यांच्या मतदार संघामध्ये ७० टक्के मतदान हे मुस्लिम समाजाचे आहे. त्यामुळे निवडणुकीत याचा फटका बसू शकतो म्हणून हे दोन्ही नगरसेवक नाराज असल्याचे समजत आहे.