अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- कृषी व्यवसायाला चालना मिळण्यासाठी व शाश्वत शेती विकास करण्याच्या दृष्टीने २०२३ वर्ष हे भरडधान्य घोषित केल्याने ज्वारी-बाजरी आदी धान्य पिकांना पुन्हा सोनेरी दिवस येणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच वार्षिक अर्थ संकल्प सादर केला. अनेक शेती अर्थतज्ञच्या मते यावर काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली.
असली तरी, पुन्हा एकदा या भरडधान्यस सुगीचे दिवस येतील असा आशावाद निर्माण झाला आहे. उत्पादन खर्च व तयार होणारा शेतीमाल यांच्यात मोठया प्रमाणात तफावत येत असल्याने, बहुतेक शेतकरी वर्गानी ज्वारी, बाजरी पिकाकडे काना डोळा केला होता.
त्या ऐवजी तितक्याच कालावधीत तयार होणारा सोयाबीन, कांदा पिकांकडे शेतकरी वर्ग प्रामुख्याने वळला होता. मात्र पोषणमूल्य परिपूर्ण अशा धान्य पिकास बाजारभाव नेहमीच पडलेला असतो.
या पिकाचे ब्रँडिंग आणी मूल्यवर्धन व्यवस्तीत झाल्यास, भविष्यात यास योग्य बाजारपेठ व हमी भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हे निश्चित.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम