Maharashtra Politics : महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्या २० जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तेथे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही गोष्टींकडे लक्ष वेधत न्यायालयावर विश्वासही व्यक्त केला आहे.
पाटील म्हणाले, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मला खत्री आहे की, निवृत्ती पूर्वी ते चांगला निर्णय देतील.

बंडखोरी केलेल्या आमदारांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. मला खात्री आहे की, बंडखोरी केलेल्या आमदारांची आमदारकी रद्द होईल. असाच निर्णय न्यायालयाकडून येईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.