अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती.आता तीही संपली असल्याने लवकरच शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यांची जाहीर केली जाणार आहे.
या नव्या विश्वस्तांच्या यादीत कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचेलक्ष लागून आहे. साईबाबा विश्वस्त मंडळातील नव्या विश्वस्तांची यादी आज सरकार न्यायालयात सादर करणार की नाही याबाबत कमालीची उत्सुकता असून साईबाबा कुणाला पावणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती. त्याची सुनावणी 22 जुन रोजी ठेवण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयात यादिवशी क्राईम बोर्ड असल्याने सुनावणीची तारीख बुधवार दि.23 रोजी ठेवली होती.
त्यानंतर 5 जुलै रोजी याबाबत सुनावणी होणार होती. पण आता ती दोन दिवस लांबणीवर पडली. आता ही यादी 7 जुलैला न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे नव्या विश्वस्तांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा आहेत. यादरम्यान साई संस्थान अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त निवडीसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू होती.
आता ही यादी 7 जुलैला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या विश्वस्तांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम