फडणवीसांचा सोलापूर दौरा यशस्वी होणार? ते दोन अपक्ष आमदार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) शनिवार ४ जून रोजी सोलापूरला (Solapur) जाणार आहेत. त्यांचा हा दौरा राज्यसभा निवडणुकीसाठी (rajyasabha election) महत्वाचा ठरणार आहे.

या दौऱ्यादरम्यान फडणवीस सोलापुरातील दोन अपक्ष आमदारांना (Independent MLAs) भेटणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक आमदार भाजप (Bjp) पुरस्कृत आहे. तर दुसरा आमदारा हा राष्ट्रवादीच्या (Ncp) जवळचा आहे.

त्यामुळे आमदारांचे मन वळवण्यासाठी फडणवीस यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) हे दोघेही अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यापैकी राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. तर करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादीशी जवळीक असलेले आमदार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबतच (Ajit Pawar) देवेंद्र फडणवीसांशीही त्यांची जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच मोठे बंधू आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) यांच्यावरील ED नोटीसीमुळे आमदार संजय शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीला फक्त आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी शिवसेनेसह भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही पक्षांचा भर अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यावर आहेत. त्यामुळे फडणवीस यांचा हा दौरा किती फायद्यात पडणार हे लवकरच समजणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe