Ayushman Card : जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना होय. अनेकांना या योजनेचा फायदा झाला आहे.
आयुष्मान कार्डधारकांना पाच लाख रुपयांचा फायदा होतो. तुम्हीही या योजनेसाठी पात्र होऊ शकता. परंतु, योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण यासाठी पात्र आहोत की नाही ते तपासावे लागेल.
पात्रता तपासा
स्टेप 1
जर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमची पात्रता तपासावी लागेल आणि ही पात्रता तुम्ही https://pmjay.gov.in/ या अधिकृत पोर्टलला भेट देऊन करू शकता.
स्टेप 2
त्यानंतर तुम्हाला वेबसाइटवर ‘Am I Eligible’ नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल.
स्टेप 3
त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाकावा लागेल. आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील. या दोन पर्यायापैकी तुम्हाला पहिल्या पर्यायामध्ये तुमचे राज्य निवडायचे आहे.
स्टेप 4
सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे तुम्हाला दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा रेशनकार्ड क्रमांक आणि 10 अंकी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकून शोधावे लागणार आहे तयानंतर तुम्हाला समजेल की योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही. जर तुम्ही पात्र असाल, तर त्यानंतर तुम्ही या योजनेचा सहज लाभ घेऊ शकता.
त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर आजच या योजनेचा लाभ घ्या. कारण या योजनेतून वेगवगळ्या आजारांसाठी मोफत पाच लाख रुपयांपर्यंत उपचार केले जातात.