Black Salt : अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणजे काळे मिठ, वाचा फायदे !

Published on -

Black Salt : मीठ आपल्या जेवणातील महत्वाचा भाग आहे. फक्त एक चिमूटभर मीठ जेवणाची चव वाढवते. तसेच आपल्या शरीरासाठी मीठ हा सोडियमचा सर्वांत मुख्य स्त्रोत असतो. शरीराला अनेक प्रकारच्या प्रक्रियांसाठी सोडियमची गरज असते. शरीरातील पेशी, द्रव पदार्थ व इलेक्ट्रोलाइड्स यांच्यातला समतोल कायम राहावा यासाठी सोडियम महत्त्वाची भूमिका निभावतं.

मीठाचे अनेक प्रकार आढळतात. ज्यामध्ये काळे मीठ देखील असते. जे जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्यात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. याच्या सेवनाने शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते. काळ्या अनेक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. आज आपण आजच्या या लेखात काळ्या मिठाच्या सेवनाने आरोग्याशी संबंधित कोणत्या समस्यांपासून सुटका मिळू शकते हे जाणून घेणार आहोत. चला तर मग…

काळे मीठ सेवन करण्याचे फायदे :-

-काळ्या मीठाचे सेवन हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करता येते. जे उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

-शरीराची पचन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी काळे मीठ खूप फायदेशीर ठरते. याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत राहते. काळे मीठ पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता आणि गॅसपासून मुक्त होण्यास आणि निरोगी पचन राखण्यास मदत करते.

-जर तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल तर काळ्या मिठाचे सेवन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काळे मीठ पाण्यात मिसळून त्याचे सेवन करावे.

-ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी काळ्या मीठाचे सेवन करावे. कारण त्यात सोडियमचे प्रमाण सामान्य मिठाच्या तुलनेत कमी असते. काळ्या मिठाच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते.

-जे लोक काळ्या मीठाचे सेवन करतात त्यांना स्नायू क्रॅम्पची समस्या नसते. यामध्ये आढळणारे पोटॅशियम घटक तुमचे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News