अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून जगभरातील शास्रज्ञ यावर लस शोधून काढण्यासाठी झटत आहेत. काही चाचण्या या शेवटच्या टप्प्यातही पोहोचल्या आहेत.
आग्रा येथील नेमिनाथ होमिओपेथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटरने कोरोना विषाणूंच औषध ब्रायोनिया एल्वा-200 विकसीत करण्याचा दावा केला आहे.
कोरोना विषाणूंनी संक्रमित असलेले रुग्ण या औषधांनी पाच ते सात दिवसात बरे होऊ शकतात असा दावाही केला जात आहे.
या औषधाच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात टूंडलामधील एफएच मेडिकल कॉलेजमधील ४२ रुग्णांवर परिक्षण करण्यात आलं होतं.
इंडियन मेडिकल रिसर्च सेंटर (आईसीएमआर) ला यासंबंधी अहवाल पाठवला असून त्यांकडून ५ मे ला परवागनी मिळाल्यानंतर कोरोना रुग्णांसाठी औषध तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
रुग्णांवर करण्यात आलेलं परिक्षण सफल ठरलं. या रुग्णांचं वय १० ते ६५ या दरम्यान होतं. दोन ते तीन दिवसात रुग्णांमधील सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणं कमी होत गेली.
४० रुग्णांना सात दिवसांपर्यंत हे औषध देण्यात आले होते. पाच ते सात दिवसात तपासणी केल्यानंतर रोगप्रतिकारकशक्तीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोरोना विषाणूंची चाचणी निगेटिव्ह दिसून आली.
नेमिनाथ होमिओपेथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांच्या सेवनाने कोरोनाचे रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जाऊ शकतात.
या औषधांचे परिक्षण यशस्वी झाल्यानंतर सेंट्रल रिसर्च काउंसिल ऑफ होमिओपेथीमध्ये पाठवण्यात आलं आहे. हे औषध निशुल्क उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com