JCB Mileage : तुम्हीही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी वापरत असाल. जेव्हा तुम्ही तुमचे नवीन वाहन खरेदी केले असेल तेव्हा तुम्ही त्या वाहनाचे मायलेज नक्कीच चेक केल असेल. टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो या वाहनांचे मायलेज चेक करताना ते वाहन एका लिटर मध्ये किती किलोमीटरचा टप्पा गाठते हे चेक केल जात.
वाहन एका लिटरमध्ये जेवढ्या किलोमीटरचा प्रवास करत तेवढे त्या वाहनाचे मायलेज असते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की, जेसीबी कितीच मायलेज देत असेल ? कदाचित तुम्ही याचा विचार केलेला असेलच, जेव्हाही तुम्ही जेसीबी पाहिलं असेल तेव्हा हा विचार येणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत आज आपण जेसीबी नेमकं कितीचे मायलेज देत, एक तास जेसीबी चालवण्यासाठी किती लिटर डिझेल लागू शकते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जेसीबीच मायलेज कसं काढतात ?
खरे तर, जेसीबी हे एक अर्थमूवर आहे. जेसीबी कंपनी अर्थमूवर बनवते. मात्र या कंपनीचेच अर्थमूव्हर अधिक प्रमाणात वापरले जात असल्याने अनेकजण याला जेसीबी म्हणूनच ओळखतात. दरम्यान जेसीबीच्या मायलेज बाबत बोलायचं झालं तर याचे मायलेज प्रति किलोमीटर नुसार काढले जात नाही. याचे मायलेज जेसीबी एक तास काम करण्यासाठी किती लिटर डिझेल वापरते यावरुन काढले जाते.
कारण की, हे वाहन खुदाई, लेव्हलिंग इत्यादी कामांसाठी वापरले जाते. विहिरीची खुदाई, शेततळ्याची खुदाई अशा अनेक प्रकारच्या खुदाई मध्ये हे मशीन वापरले जाते. रस्त्यांच्या किनारपट्टी भरण्यासाठी, शेतजमीन लेव्हलिंग करण्यासाठी देखील याच यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दरम्यान हे अवजड कार्य करणारे वाहन एक तास काम करण्यासाठी पाच ते सात लिटर डिझेल खाते.
मात्र जर कामाचा लोड वाढला तर दहा लिटर पर्यंत देखील डिझेल लागू शकते असे सांगितले जात आहे. याशिवाय या जेसीबीच्या देखभालीसाठी देखील महिन्याकाठी मोठ्या खर्च करावा लागतो. जेसीबीच्या मेंटेनन्ससाठी महिन्यासाठी तब्बल दहा ते बारा हजाराचा खर्च करावा लागतो.